प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी सामाजिक वनीकरण विभाग व मुकणे ग्रामपंचायतीतर्फे मुकणे शिवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. सर्व वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार वनमहोत्सवानिमित ग्रामपंचायतीने केला.
शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १५ जुन ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सवाचे औचित्य साधुन अधिकाधिक वृक्ष लागवडीवर भर दिला जातो. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले जावे. लहान मुलांच्या जन्माच्या औचित्याने व मृत व्यक्तीच्या स्मृती रहाव्या म्हणुनही वृक्ष लागवड करावी. इगतपुरी तालुक्यात जवळपास दिड लाख वृक्ष लागवड केल्याचे इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. सोनवणे यांनी सांगितले. मुकणे गायरानातही साडे पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आल्याचे वनरक्षक के. के. शिंदे यांनी सांगितले. सरपंच हिरामण राव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. सोनवणे, वनरक्षक के. के. शिंदे, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, चंद्रभान बोराडे, पोपट राव, काळु आवारी, शिवाजी बोराडे, मनोहर आवारी, सुरेश आवारी, तुकाराम राव, निवृत्ती आवारी आदी उपस्थित होते.