महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कार्यालयाचे उदघाटन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रणित जय महाराष्ट्र मुंबई पुणे चालक मालक सेना शाखेचे जिंदाल पॉलिफिल्म्स मुंढेगाव येथे आज उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. घोटी येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व राजसैनिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून, सुरक्षित अंतर ठेवले. शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून उत्साहात कार्यक्रम झाला.

या उदघाटन प्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस तथा नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, म.न. वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष जावेद शेख, निकितेश धाकराव, जिल्हा संघटक भगीरथ मराडे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, शाखाध्यक्ष शंकर कौदरे, वाहतूक सेना उपाध्यक्ष अंबादास भागवत, प्रकाश चव्हाण, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, कार्यध्यक्ष मनाजी चव्हाण, देविदास चव्हाण, विलास शिंदे, विजय चौधरी, ज्ञानेश्वर रसाळ, संदीप शिंगोटे, दीपक चौधरी, भीमा भोले, समाधान तांबे, माजी सरपंच रामदास आडोळे, सरपंच हरिश चव्हाण, सरपंच कैलास भगत, उपतालुकाध्यक्ष संजय सहाणे, भोलेनाथ चव्हाण, रामदास चव्हाण, उपसचिव सुमित काळे, एकनाथ चव्हाण, शरद शिंदे, दत्तू गायकवाड,भगवान गव्हाणे, दिलीप बिंनर, संजय राव, दीपक चौधरी, कुंडलिक चौधरी, मेघराज चव्हाण, समाधान तांबे, नामदेव तळपाडे, शशिकांत काळे, गोपाळ चव्हाण, गणेश मुसळे, संदीप नाठे, कार्तिक गतिर, शैलेश शर्मा आदी राजसैनिक उपस्थित होते.