काँग्रेसकडून ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन व निदर्शने

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस महासचिव राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, आमदार हिरामण खोसकर यांच्या आदेशानुसार इंदिरा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आज आंदोलन केले. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले आरक्षण ओबीसी बांधवांना  मिळालेच पाहिजे यासाठी काँग्रेस कमिटी इगतपुरी तालुक्याच्या वतीने घोटी सिन्नर फाटा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, निवृत्ती कातोरे, बाळासाहेब वालझाडे, सुदाम भोर, कमलाकर नाठे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, अरुण गायकर, प्रकाश तोकडे, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, उपाध्यक्ष गणेश कवटे, राजेंद्र भटाटे, मल्हारी गटखळ, भोलेनाथ चव्हाण, वैभव धांडे, शशिकांत पवार, विजय झनकर आदी उपस्थित होते.