भाजप ओबीसी आघाडीचे घोटीत आक्रोश आंदोलन

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीने घोटी येथील सिन्नर फाटा येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. ओबीसी तालुकाध्यक्ष रवी भागडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. घोटी सिन्नर फाटा येथे सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे हे अपयश आहे, असा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला. लवकरात लवकर आरक्षण मिळाले नाही तर ओबीसीच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष रवी भागडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, सरचिटणीस तानाजी जाधव, संपत काळे, तानाजी जाधव, पांडुरंग बऱ्हे, रमेश परदेशी, तानाजी जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, निखिल हंडोरे, कैलास भोर, पोपट बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, बबन दराडे, अनिल चौधरी, भरत रायकर, कैलास कस्तुरे, किरण फलटणकर, जगन भगत, निलेश कडू, अशोक पीचा, अशोक काळे, प्रसाद कुमठ, राजेंद्र कटकाळे, मुन्ना शेख, सागर हंडोरे, पालसिंग बगड आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!