रेल्वेचे आयसोलेशन कोच जिल्ह्यासह इगतपुरीला द्या ; मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21 ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन सर्व कोविड सेंटर व खाजगी हॉस्पिटलही फुल झाले आहेत. रुग्णांना बेड मिळत नाही. म्हणुन रेल्वेकडुन तयार  करण्यात आलेले आयसोलेशन कोच नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्याला देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांनी केली.  मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रसार नाशिक जिल्ह्यात वेगाने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा संसर्ग रोखण्याचा अथक प्रयत्न करीत आहे. परंतु रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध होत नाही. बेड मिळवण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचेही खुप हाल होत आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची खुप आवश्यकता आहे. पुरेसे बेड उपलब्ध होत नसल्याने उपाययोजना म्हणुन रेल्वेकडुन सामान्य कोचेसचे आयसोलेशन कोचेसमध्ये रूपांतर करण्यात आले होते. व त्या कोचेसचा उपयोग बेड नसलेल्या ठिकाणी करण्यात आला होता. सध्याची आपल्या राज्याची परिस्थिती पाहाता रेल्वेकडुन असे आयसोलेशनचे कोचेस उपलब्ध करुन घेऊन ते नाशिक जिल्ह्याला देण्यात यावे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की, राज्य सरकारने तातडीने रेल्वे मंत्रालयाकडे आयसोलेशन कोचेसची मागणी करावी, त्यामुळे रुग्णांसह नागरिकांचीही गैरसोय कमी होईल. जास्तीत जास्त रुग्णांना बेड उपलब्ध होतील. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनाही आवश्यक सहकार्य करेल अशी ग्वाही मनसेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी दिली. या निवेदनाच्या प्रती मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे महाप्रबंधकांना पाठवण्यात आली आहेत.

Similar Posts

Comments

Leave a Reply

error: Content is protected !!