वाढदिवसाच्या खर्चात कोरोना योद्धयांचा सन्मान ; युवासेना तालुकाप्रमुख प्रमोद कोथमिरे यांचा प्रेरक उपक्रम

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

हरसूल सारख्या आदिवासी  ग्रामीण बहुल भागात कोरोना महामारीची झळ अनेकांना सोसावी लागली आहे. त्यात अधिकाऱ्यांसह अनेक सर्वसामान्य लोकही बाधित झाले. मात्र प्रशासनाच्या योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे कोरोना संसर्गाला माघारी फिरावे लागले. हे तितकेच कौतुकास्पद आहे. ही बाब ओळखून कोरोना काळात उणीव भरून काढणाऱ्या कोरोना योद्धा खाजगी डॉक्टरांसह आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना वाढदिवसाचे औचित्य साधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यासह मास्क, सॅनिटायझर वाटप करत सत्कार, वृक्षभेट देण्यात आले. युवासेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख तथा राजमुद्रा फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद कोथमिरे यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत साधेपणाने आगळा वाढदिवस साजरा केला.

हरसूल सारख्या शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील महामारीच्या आजाराने अनेकांना बाधित केले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक कर्मचाऱ्यांना या कोरोना संसर्गाची बाधा झाली होती. यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  येणाऱ्या रुग्णाची परवड होऊ नये यासाठी येथील खाजगी डॉक्टरांनी मोठे योगदान दिले आहे. त्यात आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचा सिहाचा वाटा आहे. ही समाजसेवेची बाब ओळखून त्र्यंबकेश्वर तालुका युवासेना अध्यक्ष प्रमोद कोथमिरे यांनी कोरोना योद्धाचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, मास्क, सॅनिटायझर, उपयुक्त वृक्ष भेट देत सत्कार केला. यामुळे परिसरात कोथमिरे यांचे कौतुक होत आहे. यावेळी रवींद्र भोये, सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य, आशा कर्मचारी, खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!