भटकंती
“आभाळाचं छत,आण काळी माती वसरी,!
रानोमाळ भटकंती करितो, सोबत फक्त बासुरी!!
नको धन, नको धान, काळोखात ठाण !
लेकराले चरायाला दे रे देवा, पसाभर रान!!
दगडाची चूल, आण रिकामे ते मडके !
उपाशी ह्या जठराला, झाके काळे घोंगडे!!
कुनापाशी मांडू व्यथा देवा, चहुकडे रिकामे रान !
मुक्या प्राण्यां आवाज देता, टवकारले ते कान!!
नशिबाची भटकंती, दे वा चोहिकडे,!
मातीलाही दया येती, पडती पाया तडे!!
देव माझा खंडेराया, जेजुरीची शान !
हाक मारती दर्शन देतो, टवकारले ते कान!!.
- प्रकाश कवठेकर, इगतपुरी
( कवी कोरपगाव ता. इगतपुरी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. कवितेसोबतची दोन्ही छायाचित्रे त्यांनी स्वतःच रेखाटलेली आहेत. )

