राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

आज पंचवटी कारंजा येथे श्री महाराणा प्रतापसिंहजी युवा फाउंडेशनच्या वतीने श्री महाराणा प्रतापसिंह यांची 481 वी जयंती संपन्न झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन श्री महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्यास श्री गुरुदत्त मित्र मंडळाचे अध्यक्ष गुलाब भोये व माजी उपमहापौर व नगरसेवक गुरमित बग्गा यांनी पुष्पहार अर्पण केला. हा कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन पार पाडला. या कार्यक्रमाला स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश गिते, माजी नगरसेवक उल्हास धनवटे, ज्ञानेश्वर बोडके, दीपक चव्हाण, मयूर नाटकर, सागर चव्हाण, नितीन शेलार, नरेश पाटील, प्रविण भाटे, मनपाचे अधीक्षक तुषार देशमुख, पंचवटी पोलीस स्टेशनचे शेखर फरताळे, ग्रंथ मित्र नथु देवरे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यासह अंकुश सोनजे, शामसिंग परदेशी, अक्षय परदेशी, मनिष परदेशी, राजेंद्र परदेशी, रोहित राजपूत, प्रेमसिंग शिंदे, धीरज राजपूत, किरण राजपूत, नीरज परदेशी, सौ.पुनम ठाकुर, अनिता परदेशी, सूरजसिंग चव्हाण, राहूल परदेशी, मीना परदेशी, सुरेखा राजपूत यांच्यासह समाज बांधव मोठ्या उत्साहाने हजर होते. या कार्यक्रमात माजी शिक्षक हिरालाल परदेशी यांनी उपस्थितांना महाराणा प्रताप यांच्या कार्याचा महिमा सांगितला. कार्यक्रमाचे आयोजन युवा फाऊंडेशनचे संस्थापक अमोल ईश्वरसिंग परदेशी यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!