घटलेल्या रुग्णसंख्येने इगतपुरी तालुक्याला दिलासा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

इगतपुरी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा वेगाने प्रगती करीत आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात अवघ्या ४ नवीन रुग्णांची भर पडली असून १० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे आकडे हे नवीन बाधितांपेक्षा जास्त येत असल्याने तालुक्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी सर्वांनी अलर्ट राहणे आवश्यक आहे.

तालुक्यात आज अखेर एकूण ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यादृष्टीने पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये म्हणून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. गरज भासल्यास सर्व काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, कोरोना नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करण्यात हयगय न करता सगळ्यांनी योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.