वालदेवी धरणात पवननगरचा युवक बुडाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
आज दुपारी वालदेवी धरणात एक युवक बुडाल्याने मृत्युमुखी पडला. युवक बुडाल्याचे समजताच वाडीवऱ्हे पोलिसांनी बचावकार्य केले मात्र त्यात यश येऊ शकले नाही. नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
बुडून मृत्युमुखी पडलेला युवक पवननगर नाशिक येथील असून कमलेश सोनवणे असे त्याचे नाव आहे.
मृत युवकाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!