व्हिटीसी फाट्यावर कंटेनरवर बुलेट धडकून अपघात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

काही दिवसांपासून मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाटा अपघाताचे केंद्र बनत आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास बुलेटस्वार कंटेनरवर जाऊन धडकल्याने अपघात झाला. नरेन्द्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांच्या सतर्कतेने जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाट्यावर तीव्र वळण असल्याने नेहमीच अपघात होतात. रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना झाडाझुडपांमुळे दिसत नसल्याने अचानक अपघात होतो. आज दुपारी ४ च्या सुमारास MH15 FG 9992 ह्या बुलेट वाहनधारक वेगामध्ये समोर चालणाऱ्या कंटेनरला धडकला. ह्यामध्ये साहिल शेख वय २८ रा. इगतपुरी हा बुलेटस्वार जखमी झाला. कंटेनरचा क्रमांक RJ 47 GA 3214 असून यावेळी झालेल्या अपघातात बुलेटस्वार जखमी झाला.

अपघाताची माहिती समजताच गोंदे दुमाला येथील नरेन्द्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांच्या सतर्कतेने जखमीचे प्राण वाचले.