पंचनामे झाले असलेल्या सर्वच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने अदा करा : खासदार गोडसे यांची विमा कंपन्यांना सुचना

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

शेतकरी खेड्यात राहत असल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याविषयी फारशी माहिती नसते. शिक्षण कमी असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या नियमांचे ज्ञान नसते. सरकारी प्रकियांची खूपशी माहिती नसते. विमा कंपन्यांची नियमावली त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याने त्यांना वेळेत नियमांची माहिती मिळत नाही. असे स्पष्ट करत जरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची वेळेत तक्रार विमा कंपनीकडे केलेली नसली तरी महसूली विभागाकडून केल्या गेलेल्या पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम अदा करावी अशा सूचना खासदार गोडसे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान होवूनही विम्याची रक्कम न मिळालेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि भारत एक्सा या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक आज इगतपुरी परिसरातील ग्रॅड परिवार हॉटेलच्या दालनात पार पडली. यावेळी बोलतांना खासदार गोडसे यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वरील सूचना केल्या. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विमल तोकडे, बाळा गव्हाणे, कुलदीप चौधरी, राजेंद्र नाठे, रघुनाथ तोकडे, गटनेते विठ्ठल लंगडे, राजू धोंगडे, अशोक सुरुडे, नंदलाल भागडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान होवून आठ महिने उलटले तरी विमा कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नुकसानग्रस्तांनी आपल्या नुकसानीचे ७२ तासांमध्ये कंपनीकडे ऑनलाईन तकार केली नसल्याचे कारण सांगत विमा कंपनीने हजारो शेतकऱ्यांची क्लेम नाकारले आहेत. ऑनलाईन तकार केलेले नसली तरी शासनाच्या महसूल, कृषी विभागाकडून सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे मात्र झालेले आहेत. शेतकऱ्यांकडून ७२ तासांच्या आत जरी ऑनलाईन तकार केले गेली नसेल पण शासनाकडून पंचनामे मात्र झालेले असेल तर पंचनामे ग्राह्य धरून वंचित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तातडीने विम्याची रक्कम अदा करावी अशी विशेष सुचना खासदार हेमंत गोडसे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. इगतपुरी तालुक्यातील एकूण किती शेतकऱ्यांची नुकसान झाले पैकी किती शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली, किती रक्कम मिळाली या विषयी सविस्तर माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा कंपनीने उपलब्ध करून द्यावी, तसेच पिकविम्याच्या रकमेविषयीचा लेखाजोख्याची माहिती देण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश यावेळी खा. गोडसे यांनी विमा कंपनी प्रशासनाला दिले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!