दिवंगत नगराध्यक्षांच्या स्मरणार्थ कोविड सेंटरला जाधव परिवारातर्फे १ लाखांचे मेडीकल किट व बेंच

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

कोरोना काळात शहरातील सामाजिक चळवळीतील समाजसेवक माजी नगराध्यक्ष ॲड. युवराज जाधव यांचा महिन्यापुर्वी मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र समाजासाठी दातृत्व भावनेतुन त्यांची पत्नी ॲड. रेश्मा जाधव परिवाराच्या संकल्पनेतुन ॲड. युवराज जाधव यांच्या स्मरणार्थ इगतपुरी ग्रामीण रूग्णालयाला मदत करायचे ठरवले. इगतपुरी कोविड सेंटरला आज १ लाखाचे मेडीकल किट व बेंच भेट देण्यात आले. या बरोबरच सर्वोदय बुध्दविहारातही बेंचचे वाटप केले.
इगतपुरीत भव्य असे ग्रामीण रूग्णालय होण्यासाठी मंत्रालय ते रूग्णालय तयार होईपर्यंत ॲड. युवराज जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. या ग्रामीण रूग्णालयाचा शहरासह तालुक्यातील सर्व रूग्णांना लाभ होत आहे. ॲड. युवराज जाधव यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्यात यासाठी या रुग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामीण रूग्णालयाच्या डॉ. तृप्ती चौधरी, ॲड. रेश्मा जाधव, नगरसेविका सिमा जाधव, वकील संघाचे ॲड. जितेंद्र शिंदे, ॲड. सुनिल कोरडे आदींनी कालकथीत ॲड. युवराज जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. दिप्ती चौधरी, एस. एस पगारे, मुसळे, अनंत पासलकर यांच्यासह ॲड. रेश्मा जाधव, महिला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सिमा जाधव, ॲड. राजेंद्र चंद्रमोरे, जितेंद्र शिंदे, रविंद्र चंद्रमोरे, सोमनाथ भोसले, सुनिल कोरडे, स्मिता रोकडे, बाळा खरात, अमोल आहेर, सिध्दार्थ जाधव, प्रबुद्ध जाधव, सर्वोदय जाधव आदी उपस्थित होते.