काँग्रेसतर्फे CRMS पदाधिकाऱ्यांचा सत्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी येथे सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री तथा इंटक युनियनचे राष्ट्रीय सचिव प्रवीण बाजपेयी हे पदाधिकारी बैठकीसाठी आले होते. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा इंटक युनियनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सोबत आलेले उपाध्यक्ष अमित भटनागर, मंडल अध्यक्ष विवेक सिसोदिया, मंडल सचिव संजीव कुमार दुबे, समन्वयक राकेश श्रीवास्तव, मंडल संघटक शांताराम गांगुर्डे यांचा देखील सन्मान काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी गेल्या सात वर्षात कधी नव्हे इतका हाहाकार कामगार क्षेत्रात माजला असून सर्व संघटनांनी एकत्रितपणे येऊन काम केल्यास सरकारलाही घाम फोडू व कामगारांच्या मागण्या सरकार दरबारी मंजूर करून घेऊ असे उद्गार गुंजाळ यांनी काढले. या शिष्टमंडळात काँग्रेसचे इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सत्तार मणियार, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे, अतुल गोईकणे, शशिकांत पवार, उत्तम सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!