इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यात मागील एक दोन आठवड्यापासून शंभराच्या आत दोन आकड्यांवर आलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत. उद्याच रुग्णसंख्येची शंभरी पूर्ण होतांना औपचारिकपणे घोषित होणे फक्त बाकी आहे. निर्बंध शिथिल झाल्याने नागरिक बेशिस्त वागत राहिल्यास रुग्णसंख्येत कमालीची वाढ होऊ शकते असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार फक्त ६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यासह आज १२ नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर इगतपुरी तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ९६ झाली असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008