विविध धार्मिक कार्यक्रमांनी मानवेढे येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुक्यात मानवेढे येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आज संपन्न झाला. यानिमित्ताने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या तालुक्यातील वारकरी भाविकांनी सहभाग घेतला. इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील भाविकांनी सप्ताहात सहभाग घेतला. संपूर्ण साडेतीन दिवस चाललेल्या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मानवेढे ग्रामस्थांनी केले होते. यानिमित्ताने कानाच्या आजाराचे उपचार आणि तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. परिसरातील अनेक भजनी मंडळांनी हजेरी लावून गावात हरिमय वातावरण केले.

अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हभप श्रावण महाराज जगताप, हभप ज्ञानेश्वर महाराज कदम, हभप धनंजय महाराज गतीर, यांची कीर्तनसेवा संपन्न झाली. हभप गुरुवर्य मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले,  आगरी समाज अध्यक्ष जनार्दन माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सुनील जाधव, शिवसेना नेते कचरू पाटील डुकरे, शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख संपत काळे, पिंपळगाव घाडगाचे सरपंच देविदास देवगिरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. भाविक आणि ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी मानवेढे येथील समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Similar Posts

काळा फळा अन पांढरा खडू ; जीवघेण्या खेळाने विद्यार्थी लागले रडू : खैरेवाडीच्या विद्यार्थ्यांचा ३ नदीपात्रे ओलांडून शाळेसाठी जीवघेणा खेळ

पिंपळगाव मोर ते वासाळी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक मोठा वृक्षारोपण कार्यक्रम होणार : राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे, शिवसेनेचे खंडेराव झनकर, हरिभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली होणार निषेधात्मक वृक्षारोपण

error: Content is protected !!