घोटीच्या दुकानदारावर गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. १
पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी घोटी येथील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल होताच पहिल्याच दिवशी निर्बंधांचे पालन न करणाऱ्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, घोटीचे पोलीस रमेश चव्हाण यांच्यासह त्यांचा सहकारी पोलीस कर्मचारी हे
जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना विषाणू संदर्भातल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वासुदेव चौक येथून जात होते.
सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना भारत फोर्स बेकरी दुकानात ग्राहकांची गर्दी जमल्याचे दिसले. पोलिसांनी जाब विचारल्यानतंर आरोपी सतीश पोपटलाल वय 40 रा. श्रीरामवाडी घोटी यांनी तुम्ही कोण आहेत ? तुम्ही आमचे दुकान बंद करण्याचा काय अधिकार आहे ? तुमचा बक्कल नंबर काय आहे ? अशी अरेरावी केली. मोठ्या आवाजात बोलून लोकांची गर्दी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांच्या अंगावर धावून जात हातवारे करून मोठ्या आवाजात बोलून हुज्जत घातली. मी पोलिसांना घाबरत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. निघा माझ्या दुकानातुन असे बोलून सरकारी कामांत अडथळा निर्माण केला. या दुकानदारावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.