इगतपुरीच्या चित्रकाराने रेखाटले अनेक वर्ष चिरंतन टिकणारे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे तैलचित्र ; महाराष्ट्रभरात अहिल्यादेवींच्या जन्मोत्सवात चित्राचे होतेय कौतुक

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

भारतभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाट बांधकाम आणि अलौकिक कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रत्येकासाठी प्रेरणेचा महासागर आहे. धनगर समाज बांधव आणि देशवासीयांच्या मनात असलेल्या राजमाता अहिल्यादेवी यांचे चिरंतन कार्य त्यांच्यातील देवत्व दाखवून देते. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती चौंढी जि. अहमदनगर येथे संपन्न होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश पाटील कवठेकर यांनी राजमाता अहिल्यादेवींचे अनेक वर्ष टिकणारे तैलचित्र रेखाटले आहे. आज विविध ठिकाणी होणाऱ्या जन्मोत्सवात ह्या तैलचित्राचे कौतुक होत आहे.

संपूर्ण भारत देशात अहिल्यादेवींना राजमातेचा दर्जा असला तरी तशा प्रकारचे छायाचित्र देशभरात कुठेही उपलब्ध नाही. त्यानुसार विविध संदर्भ, इंग्रज छायाचित्रकाराने रेखाटलेले छायाचित्र त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यासले. तंतोतंत तशा प्रकारचे छायाचित्र त्यांनी स्वतः रेखाटले. ह्या छायाचित्राचे वैशिष्ट्य हे आहे की, राजमाता अहिल्यादेवींना मानणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील भिंतींवर लवकरच हे छायाचित्र दिमाखात झळकणार आहे. उभ्या पद्धतीची छायाचित्रे मुबलक उपलब्ध असली तरी त्यामध्ये चेहऱ्यांमध्ये नैसर्गिक आणि परंपरा नाही. प्रकाश कवठेकर यांनी साकारलेले छायाचित्र आडव्या पद्धतीत 24 बाय 36 इंचात रेखाटलेले आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी हे छायाचित्र झळकणार आहे. प्रत्येक धनगर बांधवांच्या घरात लवकरच हे छायाचित्र पोहोचणार आहे.

नाशिक येथील प्रहार यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद बुचुडे, इगतपुरीचे पत्रकार भास्कर सोनवणे यांनी ह्या छायाचित्राची संकल्पना मांडली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राचा अभ्यास केला. इतिहासातील अहिल्यादेवी होळकर यांचे संदर्भ तपासुन अहिल्यादेवी होळकर यांचे चित्र साकार करण्याचे ठरवले. ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील चित्रकार प्रकाश पाटील कवठेकर यांची मदत घेण्यात आली. त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन एक अप्रतिम असे अहिल्यादेवी होळकर यांचे चित्र रेखाटले. सुमारे ३०० वर्षापुर्वी फोटोग्राफी हा प्रकार नसल्यामुळे थोर महापुरुषांचे ओरिजनल फोटो अस्तित्वात नव्हते. मात्र उपलब्ध माहितीच्या आधारे रेखाटलेले हे छायाचित्र अभूतपूर्व असे पारंपरिक स्वरूपाचे आहे. अहिल्यादेवी यांना मानणाऱ्या प्रत्येक घरात हे चित्र दिमाखात झळकणार आहे.

अहिल्यादेवी जयंती निमित्ताने हे चित्र लोकार्पण करण्यासाठी चौंढी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियोजन केलेले होते. मात्र कोरोना संसर्गाचा अनुषंगाने कलम १४४ लागू असल्याने प्रकाश कवठेकर यांनी हे चित्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षद बुचडे यांनी चित्र स्वतःकडे ताब्यात घेऊन श्री. पडळकर यांना पाठवणार असल्याचे सांगितले.

चित्रकार प्रकाश पाटील कवठेकर यांच्याबाबत थोडेसे..!
मूळचे नांदेड जिल्ह्यातील कवठा येथील प्रकाश पाटील कवठेकर हे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. सुटीच्या दिवशी ते अप्रतिम चित्रे आपल्या कुंचल्यातून साकारत असतात. त्यांचे विविध चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरलेली आहेत. जगभरातील अनेक संस्था आणि देशपातळीवरील अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अतिशय प्रामाणिक, अभ्यासू आणि विचारवंत असणारे श्री. कवठेकर विविध कविता सुद्धा करतात.

प्रकाश पाटील कवठेकर यांनी एक अप्रतिम असे चित्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी मूळ साधर्म्य असणारे रेखाटले आहे. हे चित्र खुपच प्रेरणादायी असून प्रकाश कवठेकर यांचे मी ऋण व्यक्त करतो.
- गोपीचंद पडळकर, आमदार विधान परिषद
व्हिडीओ पहा
आता पर्यंत अहिल्यादेवी यांचे चरित्र जसे वाचण्यात आले तशा तशा सर्व भावना रेखाटलेल्या छायाचित्रात व्यक्त होतात. चित्रकार प्रकाश कवठेकर यांनी अतोनात मेहनत घेऊन रेखाटलेले चित्र अहिल्यादेवींच्या अनुयायांसाठी ऐतिहासिक असेच म्हणावे लागेल.
- प्रशांत लवटे पाटील, इतिहास अभ्यासक, कोल्हापूर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!