कवी – जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
क्रिकेटचा खेळ म्हणजे चेंडू फळी !
कोरोना मानव संघर्ष दिसे द्वकुळी !!
कोरोना चेंडू अन मानव होई फळी !
मानवा बाद करण्या विषाणू छळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
मानवाचे आयुष्य असे चेंडू फळी !
कोरोना करी गोलंदाजी उखळी !!
मानव जमात होई खिळ खिळी !
देहाची उडतेय अचानक त्रिफळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
मनुष्य धावचित होतोय अवेळी !
खेळेना कुणीही शतकाची खेळी !!
अर्धशतकी आयुष्य जाताय होळी !
कोरोना घेई मानवाचा जीव बळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
कोरोना खेळतोय रडीची खेळी !
खेळतोय रोजची खेळी आगळी !!
हजारोच्या जीवांना कोरोना छळी !
कोरोना मानवाला घटकन गिळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
बाधा करती डोळे नाक पोकळी !
बुरशीजन्य आजार होती बळी !!
नैमित्य सांगतोय बुरशी काळी !
धाव संख्येसम वाढे रुग्ण बळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
मानवाच्या मनात विचार घोळी !
कोरोना का सतवी माझे भाळी !!
कोरोना विषाणू घेतसे उसळी !
मानवाची लागे कसोटी सगळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
मानवा बाद करण्याची साखळी !
मानवा वस्तीत विषाणू उधळी !!
सीमेशी झेली काळीज ओंजळी !
मानवाची होई झेलबाद खेळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
कोरोना विषाणूची तोडू साखळी !
घरातच थांबुया माणसे सगळी !!
लसीकरणाची घेऊ मात्रा वेळी !
उधळू कोरोनाची कपटी खेळी !!
कोरोनाने विनली दाट साखळी !
थांबुनी घरात देऊ कोपरखळी !!
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असून नामवंत लेखक आणि कवी आहेत. )