वाकी बिटूर्ली ग्रामपंचायतीतर्फे आजादी का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत विविध उपक्रम साजरे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

वाकी बिटूर्ली ग्रामपंचायतीने आजादी का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात केले होते. ८ ऑगस्टला विशेष ग्रामसभेचे आयोजन करून नागरिकांना आजादी का अमृतमहोत्सव अभियानाची, हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. रांगोळी, घराला तोरणे बांधून अभियान सुरु झाले. ग्रामस्वच्छता उपक्रम, महिला मेळावा आरोग्य शिक्षणाचे महत्व, सेंद्रिय शेती, महिला सक्षमीकरण, रोजगार, सॅनिटरी पॅड व मासिक पाळी अशा अनेक विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

“हर घर तिरंगा” लावून विविध स्पर्धा, जसे रांगोळी, मेंहदी, चित्रकला, पाककला, निबंध, सुंदर हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. संजय गंगा रंगकर्मा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकार यांनी माझी वसुंधरा, हागणदारीमुक्त गावाचा दर्जा राखणे, जल जीवन मिशन अशा अनेक विषयांवर व्याख्यान झाले. स्पर्धेतील विजते विद्यार्थी, महिला व इतर ग्रामस्थांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील अनेक दानशूर व्यक्तीने गोपाळांची पंगत या उपक्रमासाठी पुढे येऊन फळे, लाडू आहार वाटप करून बचतगटातील महिलांनी जेवण दिले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच संदीप कुंदे, उपसरपंच अनिता काळे, ग्रामपकचायत सदस्य मयूर डोळस, मीना कडाळी, राजेश्री परदेशी, तानाजी कडाळी, अनिल डहाळे, सुनिता झुगरे, संदीप पारधी, शिपाई दशरथ डाके, ज्येष्ठ नागरिक देवराम मराडे, संगिता इरते, महिला बचतगट व ग्रामसंघातील महिला व ग्रामस्थ, तरुण युवक मंडळ, व सर्व शासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ग्रामसेविका ज्योती प्रकाश केदारे यांच्या नवनवीन संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव यशस्वीरित्या साजरा करून प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!