नाशिक जिल्ह्यातून नवीन कर्टूले वनस्पती प्रजातीचा लागला शोध : प्राध्यापकांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत मिळाले स्थान

भागवत महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

नाशिक हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातून पूर्वी सीरोपेजिया अंजनेरीका, सायलेंटव्हॅलीया  चांदवडेंसिस आणि क्रोटालारिया गजूरेलियाना अशा नवीन आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींचा शोध लागला आहे. ह्या वनस्पती नाशिक जिल्हा सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यातून नोंदविल्या गेलेल्या नाहीत. अशा दुर्मिळ वनस्पती प्रजातींमध्ये मोमोर्डिका जनार्थनामी ( Momordica janarthanamii ) नावाच्या आणखी एका नवीन वनस्पती प्रजातीचा समावेश झाला आहे. ही नवीन वनस्पती प्रजाती कारल्याच्या कुळातील असून कर्टुले ( Momordica dioica ) वनस्पती सारखी असल्यामुळे ह्या वनस्पतीलासुद्धा बोली भाषेत कर्टुले असे संबोधतात. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात करंजाळी गावाजवळील कुंभारबारी घाटातून आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भास्करगड येथून पहिल्यांदाच ह्या नवीन प्रजातीची नोंद झालेली आहे. ही नवीन वनस्पती त्याच्या नर फुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण सहपत्री वरून ओळखता येते.

हे संशोधन केव्हीएन नाईक महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. अविनाश घोळवे, मविप्रचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शरद कांबळे आणि एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. कुमार विनोद गोसावी व त्यांचा संशोधक विद्यार्थी निलेश माधव यांनी ह्या नवीन फुल वनस्पतीचा शोध लावला आहे. ह्या नव्या फुलवनस्पतीचा शोधनिबंध लुंड यूनिवर्सिटी, स्वीडन येथून प्रकाशित होणार्‍या नॉरडीक जर्नल ऑफ बॉटनी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये 12 जानेवारीला प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे जगात कारले गणात 45 प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये सहा प्रजाती आणि एक उपप्रजाती नोंदविलेली आहे. ही नवी प्रजाती भविष्यात कारल्याच्या सुधारित वाण तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे ह्या संशोधकांचे मत आहे. नवीन वनस्पतीला गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. एम. के. जनार्दनम यांचे नाव देण्यात आले आहे. प्राध्यापक जनार्दन यांनी पश्चिम घाटातील वनस्पती वर्गीकरणावर आणि दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धनाचे विशेष काम केल्याच्या सन्मानार्थ या नवीन फुल वनस्पतीला त्यांचे नाव देण्यात आले.

या संशोधन कार्यात रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्रा. डॉ. अरुण चांदोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवीन प्रजातीचे वैशिष्ट्ये बोटॅनिकल नामोमोर्डिका जनार्थनामी ( Momordica janarthanamii ) नवीन प्रजाती ही काकडी कुळातील आहे. नर आणि मादी फुले मोठी पिवळ्या रंगाची आहेत. नर फुलाचे सहपत्री लहान आणि ग्रंथीनी भरलेले आहे. फळे लंबाकार गोल आणि उपयोग भाजी करण्यास होतो. या संशोधनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. नाशिक जिल्हातून संशोधनाचे कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!