दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात टिटोली ग्रामपंचायत क्रमांक एकवर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांसाठी तातडीने निर्णय घेऊन ५ टक्के निधी खर्च केला आहे. संपूर्ण ५ टक्के निधीचा १०० टक्के वापर करून दिव्यांगांना आनंद देणारी टिटोली ग्रामपंचायत इगतपुरी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. उपसरपंच अनिल भोपे यांनी ह्या निर्णयाकामी पुढाकार घेऊन काम केल्याने दिव्यांग बांधवांनी आभार मानले.
टिटोली ग्रामपंचायतीच्या ५ टक्के रक्कमेतुन उदरनिर्वाह प्रोत्साहन निधी १२ दिव्यांगांना देण्यात आला. प्रत्येकी ५ हजार ८०० प्रमाणे एकूण ६९ हजार ६०० रुपयांचे धनादेश वितरण आज झाले. याप्रसंगी उपसरपंच अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती बोंडे, माया भडांगे, संदीप भडांगे, दशरथ हाडप, ग्रामसेवक दीपक पगार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

टिटोली येथील लाभ मिळालेले दिव्यांग बांधव असे आहेत
देवेंद्र शंकर हाडप, सुभाष मच्छिंद्र हाडप, रोहिणी कुडंलिक आडोळे, पूर्वश्री जनार्दन  करवंदे, बाळु रामचंद्र बोंडे, अक्षदा ज्ञानेश्वर मुकणे, रंजना चद्रकांत शेटे, केतन संतोष भटाटे, दिनकर मधुकर भडांगे, भगीरथ अण्णा बोंडे, शरद एकनाथ भडांगे, मिराबाई पाडुंरग दुभाषे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!