इगतपुरीची कोरोना रुग्णसंख्या वाढण्याच्या दिशेने ?

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

काही दिवसांपासून वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच इगतपुरी तालुक्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बरे होणारे रुग्ण आणि नव्याने बाधित होणारे रुग्ण यांची संख्या समान पातळीवर येत असल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या सध्यातरी स्थिर आहे. यंत्रणेला येणाऱ्या काही दिवसात रुग्णसंख्येवर नियंत्रण आणावे लागणार आहे. आज एकाच दिवशी इगतपुरी तालुक्यात १० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने ११ रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ८४ रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहणे आणि काळजी घेणे याला पर्याय नाही, त्यामुळे नागरिकांनी बिनधास्त आणि विनामास्क फिरू नये असे आवाहन इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008