एकलव्य कोविड सेंटरला गोरख बोडके यांच्याकडुन इनव्हर्टरसह ४ बॅटऱ्या भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

कोविडची रुग्ण संख्या वाढत असल्याने इगतपुरी तालुक्यातील भावली येथे कोविड सेंटर पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले आहे. मात्र या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना समजली. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी गोरखभाऊ बोडके युवा फाऊंडेशनच्या माध्यमातुन या कोविड सेंटरला नवीन इनव्हर्टरसह ४ नवीन बॅटऱ्या दिल्या. बॅटरी आणि इन्व्हर्टर देतेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा कपिलधारा पॉलिटेक्नीकचे चेअरमन कुलदीप चौधरी, संजय खातळे, दत्ता पाटील, घोटी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, माणिकखांबचे माजी सरपंच हरीश्चंद्र चव्हाण, महेश नाना शिरोळे, आरोग्य विस्तराधिकारी एस. बी. शेळके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!