राजयोग प्रतिष्ठानतर्फे विविध गावांत मोफत सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी प्रणित राजयोग प्रतिष्ठानतर्फे वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील विविध गावांत मोफत सोडीयम हायपोक्लोराईड फवारणी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. साकुर, नांदुरवैद्य, वाडीवऱ्हे, लहांगेवाडी या गावांत मोफत फवारणीला सुरूवात करण्यात आली आहे. नागरिकांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.
मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन झाले. कोरोनाच्या वाढता प्रकोपामुळे “माझं कुटुंब माझं गाव” ही जबाबदारी घेऊन मनविसे जिल्हा उपाध्यक्ष तथा राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यांनी हा उपक्रम सुरू केला. परिसरातील सर्व नागरिकांसाठी आपल्या घराप्रमाणे सर्वाची काळजी म्हणुन कार्यकर्ते काम करत आहे. त्यामुळे परिसरात कौतुक आणि उपक्रमांची स्वागत होत आहे.
कोरोना काळात मनसेतर्फे तालुक्यातील जनतेसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत. यानिमित्ताने मनसेचा बोलबाला चांगल्या प्रकारे दिसुन येत आहे. गटातील गावात मागणीनुसार फवारणी करण्यात येणार  आहे. ह्या कार्यक्रमासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मोफत फवारणीसाठी साकुर, नांदुरवैद्य, वाडीवऱ्हे ग्रामपंचायतींचे विशेष सहकार्य मिळाले. याप्रसंगी जिल्हा संघटक भगीरथ मराडे, उपाध्यक्ष संजय सहाणे, युवा नेते संदीप नाठे, साकुरचे सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकर सहाणे, नितीन काजळे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे, माणिक मुर्तडक, गोविंद डगळे, गणेश मालुंजकर, रोहीदास टिळे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, विजय कातोरे, विशाल पावशे, वैभव दातीर, रावसाहेब सहाणे, ॠषिकेश ढिकले, किशोर मुर्तडक, हरिदास रायकर, आण्णा मुसळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!