शुभ समाचार : इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दोन आकड्यांवर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

इगतपुरी तालुक्यासाठी आज अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या ३ आकड्यांवर गेली होती. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार इगतपुरी तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यांवर आली आहे. आज एकाच दिवशी तब्बल १९ कोरोना बाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली. संशयितांच्या चाचणीमध्ये नव्या १२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवस अखेर फक्त ९८ रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी “इगतपुरीनामा” सोबत बोलतांना दिली.

कोरोना लढ्यासाठी प्रशासन लोकांच्या पाठीशी

इगतपुरी तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत असून आगामी काळातही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्याला शक्य तेवढ्या लवकर कोरोनावर विजय मिळवायचा आहे यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे.
– भरत वेंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी इगतपुरी
कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारे बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!