जागतिक महिला दिन विशेष : लक्ष्मीस्वरूप बालिकेचे साकुर येथे असे झाले स्वागत…!

इगतपुरीनामा न्यूज दि. ८ :

आज जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील सहाणे परिवाराने सर्व समाजाला मोठा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. या अभुतपुर्व उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक करण्यात येत आहे. पुत्र जन्माने सामाजिक उंची जरी लाभत असली तरी भावनाच्या हिंदोळ्यावर उंच उंच अनुभव देते ती मुलगी….
मुलींच्या गर्भाचा गर्भपात करणाऱ्यांना साकुर ता. इगतपुरी येथील ज्ञानेश्वर सखाराम सहाणे यांच्या कुटूंबियांनी चांगलेच झणझणीत अंजन घातले आहे. सहाणे परिवाराने मुलीच्या जन्माकडे साक्षात लक्ष्मीच्या दृष्टीकोनातून पाहत नवा पायंडा पडून अनोखे स्वागत केले.
आहुर्ली येथून माहेराहून आणलेल्या चिमुकल्या मुलीचे रस्त्यापासून घरापर्यंत रांगोळी काढून झकास स्वागत करण्यात आले. घरापर्यंतच्या रस्त्यावर फुले अंथरून घरात प्रवेश करण्यात आला. साकुर येथील युवा भजनी मंडळाने भजनाच्या गजरात ह्या अभूतपूर्व उपक्रमात सहभाग नोंदवला. यासह फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये केक कापुन पेढे वाटले. ह्या प्रेरणादायी उपक्रमातून स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने  स्वागत करण्यात आले. समाजातील अनिष्ट परंपरेला चपराक देण्याचा सहाणे परिवाराने ह्यातून प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वर सहाणे याचे चिरंजीव आकाश सहाणे याला पहिलीच मुलगी झाली. त्यामुळे या कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. याप्रकारे स्वागत करून समाजाला एक वेगळा संदेश दिला मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मुल आहे, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे ह्या भावनेतून संपूर्ण कुटुंबीयांनी मुलीचे स्वागत केले. यावेळी सहाणे परिवाराचे नातेवाईक, युवा भजनी मंडळ, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.
एखाद्या डामडौल असणाऱ्या लग्नसोहळ्याला लाजवेल अशा पध्दतीचे नियोजन सहाणे कुटुंबासह मुलीचे काका गोकुळ यांनी आपल्या घरी आलेल्या मुलीचे स्वागत केले. लक्ष्मीस्वरूप स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येक गावात होणे नितांत गरजेचे असल्याचे मत ह.भ.प.पंढरीनाथ महाराज सहाणे आदींसह उपस्थित मित्र परिवाराने व्यक्त केले.
याप्रसंगी मुलीची आई वैष्णवी आकाश सहाणे, वडील आकाश ज्ञानेश्वर सहाणे, आजोबा ज्ञानेश्वर सखाराम सहाणे, आजी सुनिता ज्ञानेश्वर सहाणे, काका गोकुळ ज्ञानेश्वर सहाणे, आत्या मुक्ता जाधव, अर्चना कुकडे, शांताराम सहाणे, दिगंबर सहाणे, सागर भोर, दिपक सहाणे, धनुष्य सहाणे, गोकुळ सहाणे, रुपेश सहाणे, भगवान सहाणे, योगेश सहाणे, संजय सहाणे, तुकाराम भोर, प्रशांत सहाणे, श्रीकांत सहाणे, रवि सहाणे, गोकुळ गायकवाड, किरण सहाणे, संदीप सहाणे, सुर्यभान सहाणे, भाऊसाहेब सहाणे, साई सहाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

■ जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला साकुर येथील सहाणे परिवाराने बालिकेचे ऐतिहासिक स्वागत करून सर्वांचे डोळे उघडवले आहेत. एकीकडे मुलींना गर्भातच मारून टाकणारा राक्षसी समाज विघातकरित्या सक्रिय आहे. असे असतांना समाजाला जागरूकतेने विशेष संदेश देणाऱ्या सहाणे परिवाराचे आम्ही विशेष अभिनंदन करतो.

  • शिवमती माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    Shekhar Phutke says:

    आपल्या इगतपुरीनामा वेब पोर्टलच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य पार पडो अशी आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐

Leave a Reply

error: Content is protected !!