कवी : नारायण दादासाहेब गडाख
शिक्षक : न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे
सिन्नर, जि. नाशिक
सण आला आखाजीचा
पुरण पोळी जेवण
रस सोबती आंब्याचा
खरेदीला गे उधाण
कृतयुग त्रेतायुग
दोन्ही युगाचा आरंभ
परशुराम अवतार
महाभारत प्रारंभ
गंगा प्रकटे भूवरी
दिन पितृपुजनाचा
मुठभर पोहा पुड
मित्रभेट सुदाम्याचा
अन्नपूर्णा घेई जन्म
द्रौपदी वस्त्रहरण
श्रीकृष्ण द्रौपदीचा भ्राता
बहीण भावाची आठवण
विष्णुसहस्त्रनाम
आजच्या दिनी घेऊया
पितरांचे ते स्मरण
धन दानाने करूया