
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – तैनवाला फाउंडेशन व रेडिओ विश्वास यांच्या सहकार्याने डॉ. अर्पित शहा श्रीराम आय क्लिनिक नाशिक यांच्या कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकीवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी विद्यार्थी व संपूर्ण ग्रामस्थांचे मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात मोतीबिंदू दोष असलेल्यांना मोफत ऑपरेशनसाठी सुविधा देण्यात येणार आहे. तैनवाला फाउंडेशन व रेडिओ विश्वास यांच्या सहकार्याने श्रीराम आय क्लिनिक नाशिक हे इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावे व वाड्यापाड्यात जाऊन मोफत नेत्र तपासणी सेवा राबवीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची माहिती राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी ग्रामस्थांना दिली. याप्रसंगी तैनवाला फाउंडेशनचे विनोद सूर्यवंशी, पंकज महाजन, ज्ञानेश्वर शिरसाठ रेडिओ विश्वास, हेमंत इसे, अर्सानाल अन्सारी, श्रीराम आय क्लिनिक नाशिकचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले, चांगुणा आगिवले ग्रामपंचायत सदस्य, बबन आगिवले यांनी परिश्रम घेतले.

