
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
मुंबई आग्रा महामार्गावरील राजूर फाट्यावर आज रात्री 7 वाजता दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात २ गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
नासिकच्या दिशेने मुंबई कडे जाणारी मोटार सायकल क्र. MH 01 5001 ह्या मोटार सायकलला विरूद्ध दिशेने येणारी मोटार सायकल क्र. MH 15 CU 1497 हिने समोरा समोर जोरदार धडक दिली. ह्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ३ जण किरकोळ जखमी झाले. विपुल महेंद्र सिगगाडिया वय 33, तुषार रॉय वय 30 रा. मुंबई प्रभादेवी, अजय संपत सुपे वय 17, गुलाब व्यंकटेश बांगर वय 21, राहुल तुकाराम बांगर 14 रा. आंबेबहुला ता. जि. नासिक अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना नासिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.