केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याकडून गुप्ता परिवाराचे सांत्वन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
इगतपुरी शहरातील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांना मातृशोक झाल्याने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजेंद्र गुप्ता यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट दिली. रामदास आठवले यांचे राजेंद्र गुप्ता यांच्या घरी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांनी घरी जाऊन त्यांचे सात्वंन केले. या प्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उप नगराध्यक्ष नईम खान, रिपाईचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सुनिल रोकडे, अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि. ना. उघाडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष मंगेश रोकडे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुप्ता, विजय गुप्ता, रेल्वे युनियनचे शेखर धात्रक, सोनु रोकडे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!