आदिवासी समाजातील प्रा. डॉ. सखाराम उघडे यांनी वाढवली इगतपुरी तालुक्याची शान : राज्यपालांच्या हस्ते “यशवंतराव चव्हाण” सुवर्णपदकाने मिळाला मोठा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील उघडेवाडी देवळे येथील आदिवासी ठाकूर समाजातील प्रा. डॉ. सखाराम सन्या उघडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३० व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी “यशवंतराव चव्हाण” सुवर्णपदकाने सन्मानित केले. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये विशेष प्राविण्याने महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल प्रा. डॉ. सखाराम उघडे यांचा राज्यपालांनी विशेष सन्मान केला. महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी / पदविका / पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ आज सोमवारी ज्ञानगंगोत्री परिसर, गोवर्धन, नाशिक येथे संपन्न झाला. प्रा. डॉ. सखाराम उघडे यांच्या कामगिरीने इगतपुरी तालुक्याची आणि आदिवासी समाजाची शान राज्यभरात वाढली असल्याचे आदिवासी म. ठाकूर ठाकर समाज इगतपुरी तालुकाध्यक्ष तथा घोटी बाजार समितीचे संचालक ॲड. मारुती आघाण यांनी सांगितले. डॉ. उघडे यांच्या यशाबद्धल इगतपुरी तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. प्रतिकूल परिस्थितीतील कुटुंबातील प्रा. डॉ. सखाराम सन्या उघडे यांचे शिक्षण एमकॉम, पीएचडी, सेट, एमए (इकॉनॉमिक ), em एमबीए (फायनान्स ),एलएलबी, डिटीएल, डीएलएल & एलडब्ल्यू, जीडीसीए, सीएचएम झाले आहे. एमबीए मध्येही त्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. १२ वर्षांपासून ते रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, पुणे येथे नोकरी करतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पीएचडी (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ) या विषयाचे ते मार्गदर्शन करतात. आहे. दीक्षांत समारंभ कार्यक्रमात राज्याच्या वेगवेगळ्या विद्यापीठातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!