कोटंबी घाटात २८ लाख ५५ हजाराची अवैध दारू जप्त ; विशेष पथकाची यशस्वी कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – दिव दमणला निर्मित पण महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली विदेशी दारु एका आयशरमध्ये भरुन पेठ मार्गे नाशिककडे येत आहे अशी गुप्त माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पुढील कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्र. ४ चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, हवालदार कैलास रामदास बागुल, किरण रामदास आहेर, श्रीराम दत्तात्रय वारुंगसे यांनी याबाबत नियोजन केले. पथकाने पेठकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येत असलेला आयशर क्र. एमएच ०४ एलई ६९७४ थांबवून तपासणी करण्यात आली. यामध्ये ड्रायव्हर बाजुच्या एका स्वतंत्र पत्र्याच्या कप्प्यात २८ लाख ५५ हजार ४४० रुपये किमतीचा विदेशी मद्याचा मुद्देमाल आढळून आला. संशयित आरोपी वाहनचालक दिपक संजय काळे वय २५, रा. बोधेगाव ता. दारवा, जि. यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे. पेठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

error: Content is protected !!