बलायदुरी येथे दहशत निर्माण करणाऱ्या ३ जणांवर इगतपुरीत गुन्हा दाखल 

इगतपुरीनामा न्यूज – बलायदुरी ता. इगतपुरी येथे सुरु असलेल्या घराचे बांधकाम पाडणाऱ्या आरोपींना घराचे बांधकाम का पाडता विचारल्याचा राग आरोपी मंगेश वाघू आव्हाड, अनिल वाघू आव्हाड, माधुरी मंगेश आव्हाड यांना राग आला. त्यांनी फिर्यादी उज्वला शिवाजी आव्हाड यांच्या घरी कोयता, सुरी, नॉन चाकू असे हत्यार घेऊन जावुन दहशत निर्माण केली. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर धावून जावुन शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचा दम दिला. फिर्यादीची मुलगी साक्षीदार सोनाली शिवाजी आव्हाड, पुतण्या वैभव गोविंद आव्हाड, जाऊबाई विमल गोविंद आव्हाड, ललिता तानाजी आव्हाड हे घरी होते. यावेळी आरोपी मंगेश वाघू आव्हाड याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर नॉन चाकु मारुन आपखुशीने दुखापत केली. आरोपी माधुरी मंगेश आव्हाड हिने शिवीगाळ केली अशी फिर्याद इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. इगतपुरी पोलिसांनी गुरनं २३७/२०२५ बीएनएस कलम ११८ (१), ३५१ (२) (३),३५२,३ (५) महा. पो. का कलम ३७(१) (३) (क) चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असून आरोपींचा कसून शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान संबंधित आरोपींवर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला प्रकारची कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

error: Content is protected !!