CMA : कॉमर्स/वाणिज्य क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्यासाठी गेटपास : “कॉस्टिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, माहिती विश्लेषण, टॅक्सेशन आणि इतर शाखांमध्ये छाप पाडण्यासाठी उत्तम संधी”

सीएमए ही एक जागतिक मान्यता मिळालेली प्रोफेशनल डिग्री असून अत्यंत कमी खर्चिक आणि कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळवता येते. कोर्सला लागणारा एकूण खर्च अंदाजे ४५,००० इतका येतो. CMA झाल्यानंतर लगेचच एक चांगल्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते. पदवी मिळाल्यानंतर संस्थेकडून कॅम्पसचे आयोजन केले जाते. ज्यात बहुविध उद्योग, सरकारी, निम सरकारी, खाजगी कंपन्या सहभागी होत असतात. २०२२ च्या आकडेवारीनुसार सरासरी १० लाख तर उच्चांकी २७.५० लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळवण्यात विद्यार्थ्यांना यश आले.
- सीएमए भूषण उत्तम पागेरे
अध्यक्ष, नाशिक शाखा, दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडिया

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया ही एक संसदेच्या कायद्यांतर्गत वैधानिक संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षणाचे संयोजन केले जाते. याच संस्थेला जीएसटी आणि कॉस्ट ऑडिट या क्षेत्रात काही कायदेशीर अधिकारही दिलेले आहेत. CMA ही प्रोफेशनल डिग्री असून या क्षेत्रात आपल्याला काय संधी आहेत हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आजची CMA ही डिग्री २०११ पूर्वी कायद्यात बदल होण्याआधी ICWA ( Cost & Works Accountant ) नावाने ओळखली जायची. सरकारने कार्यक्षेत्र लक्षात घेऊन कायद्यात बदल करून ICWA हे नाव बदलून CMA म्हणजेच Cost & Management Accountant असं केलं.

सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झाल्याने प्रत्येक बिझनेसला मार्केटमध्ये आपलं स्थान टिकवणं हे एक प्रकारे आव्हान आहे. त्यासाठी वस्तूची किंमत, वस्तूची गुणवत्ता, वस्तूपासून व्यवसायाला होणारा नफा ह्या 3 बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.  आपल्या मालाची क्वालिटी कमी न करता वस्तूची किंमत कमीतकमी ठेवणे आणि त्यापासून प्रॉफिट कमवणे हे जागतिक पातळीवर सगळ्याच व्यवसायांसमोरचं मोठं आव्हान आहे. यासाठी CMA चे स्थान सर्वात महत्वाचे आहे. कारण कॉस्ट अकाऊंटंट व्यवसायाला लागू होतील अशा विविध प्रकारच्या टेक्निक वापरून कॉस्टिंग करतात. व्यवसायात नक्की कुठे फायदा होत आहे आणि कोणत्या प्रॉडक्ट्समध्ये तोटा होत आहे ह्या गोष्टींचं अगदी मुळापर्यंत जाऊन विश्लेषण केले जाते. त्यावर व्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. विविध देशात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये CMA आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत नुसतं कॉस्टिंग पुरतं मर्यादित न राहता व्यवसायात अनेक क्षेत्रात जसं की उद्योगात अप्रत्यक्ष कर, उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य वापर, खरेदी विक्री, एचआर, स्टोअर्स, आंतरराष्ट्रीय टॅक्ससेशन, इंटरनॅशनल फायनान्स या खात्यांमध्ये उच्चपदार कार्यरत आहेत. अगदीच उदाहरण घ्यायचं ठरलं तर ऑइल अँड गॅस, वीज, कोळसा, स्टील, सिमेंट या क्षेत्रातील अनेक नामांकित खाजगी तसेच सरकारी निम-सरकारी कंपन्यांमध्ये अगदी चेअरमन, कार्यकारी संचालक, सीइओ, सीएफओ पदावर सीएमए कार्यरत आहेत.

उद्योगांसोबत सर्व्हिस सेक्टर मध्येही वेगळी छाप सीएमएची आहे. बॅंकिंग, आयटी, टेलिकॉम या क्षेत्रात महत्वाच्या स्थानावर सीएमए कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात CMA हे अर्थव्यवस्थेचं भविष्य ठरणार आहे. कॉमर्समध्ये सीए आणि सीएस सोबत सीएमए हा उत्तम पर्याय असून विद्यार्थी आकर्षित होत आहेत. सीएमएचा अभ्यासक्रम तीन टप्प्यात विभागलेला असून बारावीच्या वर्गानंतर पहिला टप्पा फाउंडेशन करून पुढच्या इंटरमिजीएटला प्रवेश मिळतो. पदवीधर विद्यार्थ्यांना दुसऱ्या म्हणजेच इंटरमीजीएट आणि इंटरमीजीएट नंतर फायनल टप्प्यात प्रवेश मिळतो. हा कोर्स करताना विद्यार्थ्यांना कॉम्पुटर कौशल्य, संवाद कौशल्य याचे काही प्रमाणात प्रशिक्षण दिले जाते. यासोबत कमवा आणि शिका तत्वावर कमीत कमी कोर्स चालू असतानाच ३ वर्ष (१.५ वर्ष कंपल्सरी ) इंडस्ट्रियल प्रॅक्टिकल ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. ज्यातून विद्यार्थी काय शिकला आणि प्रत्यक्षात काय काम चालते याचा अनुभव मिळतो  त्याच सोबत स्टायपेंड मिळावा याची तरतूद संस्थेने केलेली आहे. संस्थेची शाखा नाशिकमध्ये असून प्रसन्ना आर्केड, त्र्यंबक नाका येथे आहे. संपर्क क्रमांक ०२५३ २५००१५०, असून व्हाट्सएप क्रमांक ९४२३७३४९०० आहे.

कोर्सचा कालावधी खालील प्रमाणे आहे ( विषयांचे ग्रुप ) :
१. फाउंडेशन – ६ महिने ( १ ग्रुप ४ विषय )
२. इंटरमिजीएट – १ वर्ष ( २ ग्रुप ८ विषय )
३. फायनल – १ वर्ष ( २ ग्रुप ८ विषय )
अभ्यासक्रमात खालील विषयांचा प्रामुख्याने समावेश असतो :
१. इकॉनॉमिक्स
२. अकाऊंटंसी
३. कॉस्ट अकाउंटिंग
४. मॅनेजमेंट अकाउंटिंग
५. डायरेक्ट आणि इंडायरेक्ट टॅक्स
६. फायनान्स मॅनेजमेंट
७. बिझनेस व्हॅल्यूएशन
८. कॉर्पोरेट लॉ

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!