
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व लकी ( लक्ष्मण ) गोवर्धने यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते लकी गोवर्धने यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तालुक्यात समाज संघटन, मराठा महासंघाचे संघटनात्मक कार्य, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विषयी समाजामध्ये जनजागृती करणे आदी संघटनात्मक कामे करण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे. लकी गोवर्धने यांचे इगतपुरी तालुक्यात सामाजिक काम चांगले असून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी व्यक्त केला. गोवर्धने यांच्या निवडीचे आमदार हिरामण खोसकर, ॲड. संदीप गुळवे, उदय जाधव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, प्रशासकीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, योगेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख नानाभाऊ बच्छाव, शहराध्यक्ष संजय फडोळ, मुख्य प्रवक्ते गौरव गाजरे, संदीप बऱ्हे, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष शोभा सोनवणे, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव यांच्या प्रयत्नांमुळे माझ्या महत्वाची जबाबदारी दिली. त्या माध्यमातून तालुक्यातील मराठा समाजाला न्याय देईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सरकारी योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोचवेल अशी प्रतिक्रिया लकी गोवर्धने यांनी व्यक्त केली.