राष्ट्रीय संस्थेत पीएचडी मिळवण्याची संधी

पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर नामांकित, नावाजलेल्या राष्ट्रीय संस्थेत, विद्यापीठात संशोधन करण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी भारतातील अग्रगण्य संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या विषयावर सर्वंकष मार्गदर्शन करताहेत स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी..!

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

उच्च शिक्षण व संशोधनाचे स्वप्न
अनेक विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर नामांकित, नावाजलेल्या राष्ट्रीय संस्थेत, विद्यापीठात संशोधन करण्याचे स्वप्न पहात असतात. या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी भारतातील अग्रगण्य संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

आय आय आय टी टी ( IIITT )
तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेत ( Indian Institute Of Information Technology Tiruchirappalli ) पीएचडी  ( Full Time / Part Time ) करण्यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून IIITT ही भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची संस्था होय.

विभाग व विषय
खालील विभागांमध्ये व विषयांमध्ये विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
1. Computer Science and Engineering ( CSE )
2. Electronics and Communication Engineering  ( ECE )
3. Mechanical Engineering ( ME )
4. Physics.
5. Mathematics
6. Economics
7. English

इतर महत्वाची माहिती
यासाठी प्रवेशाकरिता शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया ( Selection Procedure ), प्रवेश प्रक्रिया ( Admission Procedure ), राष्ट्रीय संस्थेविषयी IIITT विषयी माहिती, अभ्यासक्रमाची फी ( Fee Structure ), अर्ज करण्याची प्रक्रिया ( Application Procedure ), ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती ( Steps to apply for online application ), अर्जासोबत पाठविण्याची प्रमाणपत्रे, अर्जाची फी व फी पाठविण्याची पद्धत आणि संबंधित संपूर्ण माहितीसाठी www.iiitt.ac.in या संकेतस्थळावरील माहिती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून, अभ्यास करून ऑनलाईन अर्ज करावा.

ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला दि. ३० एप्रिल २०२१ पासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज संबंधित संस्थेला मिळण्याची अंतिम तारीख दि. ३१ मे २०२१ ही आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    तांत्रिक शिक्षण महत्वपूर्ण आहे, परंतु त्याविषयी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.आणि त्यापासून वंचित राहतात. आपण प्रवेश प्रक्रिया विषयी महत्व पूर्ण माहिती दिली. धन्यवाद !

Leave a Reply

error: Content is protected !!