
इगतपुरीनामा न्यूज – कृष्णनगर येथे ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृध्द ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती रॅली संपन्न झाली. ग्रामपंचायत कृष्णनगर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष ग्रामसभेत मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान राबवण्याबाबत नियोजन व कार्यपद्धतीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी गाव अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य नंदु आंबवणे, सरपंच, उपसरपंच, सदस्या, सदस्य, संपर्क अधिकारी पवार, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभाग कर्मचारी, कृषि सहाय्यक, तलाठी, शेतकरी बचतगट सदस्य, गाव विकास समिती अध्यक्ष, सदस्य, शालेय शिक्षण समिती, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, अध्यक्ष,सदस्य, महिला बचतगट, सीआरपी, पोलीस पाटील, सोसायटी सदस्य, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक सर्व सहभागी झाले होते.