बालकवी पियुष चंद्रकांत गांगुर्डे, इयत्ता 7 वी
ज. वि. पवननगर, नाशिक
नाशिकचा बालकवी पियुष गांगुर्डे नुकताच कोरोनामुक्त झाला. याबद्धल उत्कटतेने त्याने केलेली ही कविता
झालो मी कोरोनामुक्त |
आता वाटते सशक्त
करोनामुळे झालो
होतो अशक्त ||1||
भेटणार पप्पा, आजी,
बाबा, दीदी, भावाला ||
वर एकटे वाटे
जणू काही
गेलो अनोळखी गावाला ||2||
या लढ्यात मिळाली मला
कुटुंबाची मोलाची साथ
मावशी, मामा, आत्याही
फोन करत दिन रात ||3||
आज मला होतो
आनंद खूप
कारण भाऊ बहीण
यायचे तेव्हा बसायचो चूप ||4||
झालीय भेटायची
उत्सुकता, आतुरता
असं झालंय केव्हा येतो
तो क्षण आता ||5||
आई आजारी असल्याने
आजीवरच कामाचा भार
संकटातून आलोत बाहेर
देवदूत डॉक्टरांचे आभार ||6||
Comments