
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ जनजागृती मोहीम अंतर्गत १४ ऑगस्टला घोटीतून मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महिला, युवकांचा मोठा सहभाग लाभला. १५ ऑगस्टला शहरात घोटी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून भंडारदरा चौक ते जनता विद्यालय अंमली पदार्थ जनजागृती रॅली मध्ये विद्यार्थी, वकील बंधू, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका, निवृत्त आर्मी अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मराठी अभिनेता चिन्मय उदगीर यांनीही घोटीतील सर्व नागरिकांसाठी अंमली पदार्थ विरोधी अभियानाबाबत जनजागृती केली. यावेळी अभियानात सहभागी नागरिकांचा सन्मान करण्यात आला. रुग्णवाहिका चालक, अपघातातील क्रेन चालक, विविध क्षेत्रातील समाजसेवक, पोलीस मित्र आणि वनसंवर्धन मित्र बंटी पगारे यांचा सन्मान करण्यात आला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी घोटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक उदय, पोलीस उपनिरीक्षक देवरे मॅडम, ह्या अभियानाचे नियोजन करणारे पोलीस हवालदार सागर सौदागर, राहुल गांगुर्डे, लक्ष्मण धकाते, सुनील पाटील, निलेश साळवे, नितीन कटारे, परीक्षित, इंगळे, अनिल मोरे आदींनी परिश्रम घेतले. घोटीतील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्धल पोलीस ठाण्यातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
