
इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्य दिनानिमित्त खैरगाव जिल्हा परिषद शाळेसाठी विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. थायसन कृप कंपनीच्या माध्यमातून ६ वर्ग खोल्यांची तर पंचायत समितीच्या माध्यमातून २ वर्ग खोल्यांची मंजुरी मिळाली. या उल्लेखनीय कामगिरीमागे आदर्श शिक्षक विलास गवळे, मुख्याध्यापक कैलास शिंदे, मनोज वाघ, शैलेंद्र भामरे, नंदिनी कुलकर्णी, पार्वता गिळंदे, ज्योती टोचे व साबळे यांच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. या कार्याची दखल घेत खैरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी अशा समर्पित व प्रगतीशील शिक्षकांची प्रत्येक शाळेला गरज आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरगावचे सरपंच ॲड. मारुती आघाण, उपसरपंच गणेश गायकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा साळुंखे, सदस्य रामदास जाखेरे, अनिल परदेशी, बुधा गांगड, अरुण गायकर, ईश्वर दालभगत, मच्छिन्द्र गायकर, रघुनाथ बोराडे, अशोक शिद, काळू रेरे, आनंदा आघाण, गोविंद आघाण, अंकुश तोकडे, गोरख गायकर, मणिराम मदगे, राघू हंबीर, शालेय समिती सदस्य आणि गावातील मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या विकासासाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व सुसज्ज शिक्षण वातावरण मिळणार असून, खैरगावची शाळा ग्रामीण भागातील आदर्श शिक्षणकेंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमावेळी पोलीस पाटील, तरुण मित्र मंडळ, आरोग्य सेविका, वन कर्मचारी, विविध कार्यकारी सोसायटी संचालक, महिला बचत गट, माध्यमिक शाळा खैरगावचे मुख्याध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.