
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक ग्रामीण पोलीस दल अंतर्गत इगतपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने १३ ते १७ ऑगस्ट ह्या काळात अंमली पदार्थ विरोधी मोहीमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील इगतपुरी पोलीस स्टेशन आवारात, तहसील कार्यालय, इगतपुरी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये, सर्व ग्रामपंचायत कार्यालय आवारात अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली आहे. इगतपुरी शहरातील लिटील ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थ्यांसह शहरात रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय, विद्यालयातील प्राचार्य व शिक्षक, विद्यार्थी, हद्दीतील २४ गाव ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ व ग्रामसेवक उपस्थित होते. इगतपुरी तहसील कार्यालयात ध्वजारोहनानंतर शपथ कार्यक्रम झाला. यामध्ये आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार अभिजित बारवकर, नायब तहसीलदार व अधिकारी कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील. अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार इगतपुरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सारिका अहिरराव, उपनिरीक्षक शैलेश पाटील, अमोल गायधनी, कांचन भोजने, पोलीस अंमलदार गणेश परदेशी, शंकर तातडे, विनोद गोसावी, निलेश देवराज, प्रदीप घेगडमल, महेद्र गवळी, विजय रुद्रे व दिपक पटेकर आदीनी मोहिमेची अंमलबजावणी केली आहे.
