श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी कार्यान्वित : माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते झाला कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी अतिशय फायदेशीर आहे. महिलांमधील कर्तृत्व आणि नेतृत्व विकसित होण्यासाठी सूतगिरणीची संकल्पना अतिशय उपयुक्त ठरेल. दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने बापू यांच्या दुरगामी दृष्टीकोनातून शेकडो महिलांच्या रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटला असल्याने त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करावेत असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. माझ्या समाजकल्याणमंत्री पदाच्या काळात ह्या प्रकल्पाला मी स्वतः मंजुरी देऊन महिलांसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरू शकतो असे बोललो होतो. हे सत्यात येतांना आनंद वाटत असून आगामी काळात महिलांनी जागतिक पातळीवर लौकिक वाढवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. नवीन सूतगिरणीच्या मशिनरी कार्यान्वित करणे व पूजनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न करताना ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्याचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते व सूतगिरणीचे संस्थापक व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने ( बापू ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. इगतपुरीचे युवा नेते वामन खोसकर यावेळी उपस्थित होते. दौंडतचे सरपंच पांडुरंग शिंदे, स्वामी समर्थ सूतगिरणीच्या चेअरमन डॉ. नीता माने, व्हा. चेअरमन संघमित्रा गजरे, कोल्हापूर भाजयुमो जिल्हाध्यक्ष अरविंद माने, कार्यकारी संचालक सुहास राजमाने, संचालिका सारिका माने, सुनिता चव्हाण, रूपाली राजमाने, विद्या सोनवणे, रोहिणी राजमाने, रजनी रोकडे, तज्ञ संचालिका सरस्वती वाकचौरे, सूतगिरणीचे आर्किटेक्ट श्रीकांत पाटील, कॉन्ट्रॅक्टर संदीप हवाने, नानासाहेब राजमाने, रत्नाकर गजरे, माजलगाव सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुजित थोरात, विवेकानंद पाटील, निवृत्त पोलीस उप अधीक्षक विलास भोसले, उद्योगपती विजय गलगले, संजय बिडकर, गजानन माने, जनरल मॅनेजर सुरेंद्र अनगली, असिस्टंट जनरल मॅनेजर सुकुमार चव्हाण, चीफ अकाउंटंट संतोष माने, ओंकार माने यांसह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!