
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (दि. ०५ मे) जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत आज अधिकृत पत्र काढले असून उद्या दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आणि शाळांना निकाल पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मंडळांनी डीजीलॉकर ॲपवरही निकाल उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले असल्याने निकाल लागल्यानंतर डीजीलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालावर काही आक्षेप घ्यावयाचा आहे किंवा पुनर्मूल्यांकनासाठी मागणी करावयाची आहे त्यांच्यासाठी 06 मे पासून 20 मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://results.digilocker.gov.in http://hscresult.mkcl.org https://mahahsscboard.in
