इगतपुरीनामा न्यूज, दि. १
धामणगाव जिल्हा परिषद गटातील सर्वतीर्थ टाकेद येथे पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाविकांना फराळाचे वाटप केले. फराळ वाटप कार्यक्रमाची संकल्पना शिवसेनेचे राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर यांनी केली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खिचडी, केळी असा फराळ वाटप करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
सर्वतीर्थ टाकेद हे भाविकांसाठी श्रावण महिन्यात प्रसिद्ध असे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी भेट देणाऱ्या भाविकांना फराळ वाटप करून जनसेवेला हातभार लावण्यासाठी आज आम्ही सर्वांनी काम केले. यानिमित्ताने सर्वांशी संवाद साधून लोकांची सेवा करण्यासाठी सर्वांनी संकल्प सुद्धा केला. यापुढेही धामणगाव गटात जनतेतील परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी आम्ही शिवसैनिक कटीबद्ध आहोत.
- खंडेराव झनकर, शिवसेना, अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, राजाभाऊ घोरपडे, उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, गटप्रमुख साहेबराव झनकर, रंगनाथ कचरे, कैलास गाढवे, गणप्रमुख शिवाजी काळे, भीमराव साबळे, युवासेना उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब वाजे, सुदाम भोसले, हेमंत झनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच रतन बांबळे,बहिरू केवारे, रामभाऊ परदेशी, भास्कर वाजे, शिवाजी गाढवे, ज्ञानेश्वर मोंढे, पोपटराव लहामगे, नवनाथ झनकर, भाऊसाहेब वाजे, निवृत्ती आगिवले, दिलीप पोटकुले, गणेश टोचे, अशोक गाढवे, साहेबराव बांबळे, नवनाथ बऱ्हे, योगेश जुंद्रे, नंदु जाधव, युवा गटप्रमुख राहुल लगड, आरपीआय नेते दत्तू झनकर, राजेंद्र भोसले, संग्रामभाऊ, आनंदा कोरडे, तानाजी गाढवे, प्रवीण पवार, पंडित गायकवाड, शिवाजी जुंद्रे, राजाराम गाढवे यांच्यासह धामणगाव गटातील शिवसैनिक आणि भाविक उपस्थित होते.