
इगतपुरीनामा न्यूज – प्रहार सैनिक कल्याण संघातर्फे विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या गुणवंतांना इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पत्रकार, राजकीय, दिव्यांग, पोलीस, आरोग्य, धार्मिक आणि सैनिकांचे आई वडील आदींचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा २७ एप्रिलला घोटी येथील मातोश्री लॉन्स येथे संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे यांनी केले आहे.
आरोग्य क्षेत्रातून डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. सजन दुभाषे, धार्मिक क्षेत्रात हभप धनंजय महाराज गतीर, आदर्श शेतकरी गोकुळ जाधव, सामाजिक क्षेत्रातील विनोद नाठे, वैशाली गोसावी, आशासेविका मंदाबाई ढगे, बंटी पगारे, सुभाष गायकर, ॲड. दिलीप खातळे, पोलीस दलातील योगेश यंदे, सैनिक विलास मांडे, ज्येष्ठ पत्रकार के. टी. राजोळे, प्रहार सेवक सपन परदेशी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ह्या पुरस्काराचा उद्देश देशहितासाठी चांगल्या व्यक्तींना एकत्र आणून व त्यांच्या कार्याचे कौतुक करणे होय. इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार इतर पुरस्कारापेक्षा वेगळा पुरस्कार असून देशसेवा करणार्या सैनिकांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी कुठल्याही पुरस्कारार्थीकडून पैसे किंवा मोबदला घेतला जात नसल्याचे आयोजक माजी सैनिक विजय कातोरे यांनी सांगितले.