
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
रुग्णांचा ऑक्सीजन तपासण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात ऑक्सीमिटर संख्या कमी पडत आहे. त्यानुसार किसान सभेचे तालुकाध्यक्ष मदन चोरडीया यांनी इगतपुरी ग्रामीण रूग्णालय कोविड सेंटरला १० ऑक्सीमिटर भेट दिले. काही दिवसात तीन संगणक भेट देणार असल्याचा त्यांनी शब्द दिला. वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी रूग्णालयात जनरेटर व संगणक संचाची गरज असल्याचे सांगताच चोरडिया यांनी डॉ. देवरे यांना काही दिवसातच संच उपलब्ध देऊ असे सांगितले.
ऑक्सिमिटरमुळे गरज असणाऱ्या रूग्णाला ऑक्सीजन देता येणे शक्य होणार आहे. चोरडीया म्हणाले मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी नसुन केवळ सामाजिक सेवा म्हणुन मानवसेवा करतो आहे. आज ही वेळ आहे म्हणुन मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे चोरडीया म्हणाले. वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, किसान सभेचे तालुकाध्यक्ष मदन चोरडिया, नगरसेवक दिनेश कोळेकर, जगदीश मंत्री, खंडेराव नाठे, आकाश चोरडीया, सुरक्षा सेवक रामदास आवारी, पिंटु धांडे, सचिन म्हसणे, राकेश निरगुडे, अनंत पासलकर, विशाल आगमाने, प्रयोग शाळा व्यवस्थापक संजय वाणी, प्रशांत बाविस्कर आदी उपस्थित होते.