अनेकांच्या घरातील “कुलदीप” वाचवणारा कोरोना योद्धा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )
इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अत्यावश्यक आरोग्य सेवांवर सुद्धा ताण वाढलाय. रुग्णांसाठी असणाऱ्या भयानक परिस्थितीत अनेक सेवाभावी कोरोना योद्ध्यांनी आपला मदतीचा हात रुग्णांच्या सेवेसाठी पुढे केला आहे. कोरोना योद्धे शिवसेना तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी यांनीही मदतीच्या मैदानात धाव घेतली आहे. दशमेश दरबार गुरुव्दारा व सिंहस्थ शाहीस्नानासाठी प्रसिद्ध असलेले कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्राचे ट्रस्टी म्हणून कुलदीप चौधरी काम पाहत आहेत. गतवर्षी अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईचे मजुर, कामगार वर्ग महामार्गाने पायपिट करीत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमध्ये आपल्या गावी चालले होते. या काळात सर्वच खाद्य पदार्थाची दुकाने, हॉटेल बंद असल्याने या मजुर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. यावेळी कुलदीप चौधरी यांनी तात्काळ पुढे होऊन गुरुव्दारा व कपिलधारा येथे लंगर सुरू केले. भर उन्हात जाणाऱ्या हजारो गरीब दुबळ्या वाटसरुंची भुक भागविण्याचे काम त्यांनी महिनाभर अखंड सुरु ठेवले होते.
मेडिकल क्षेत्रात असल्याने चौधरी यांना ऑक्सीजन, बेडसाठी तालुक्यातुन अनेक कोरोना रुग्णांचे नातेवाईक विनवणी करत असतात. रुग्णांचा स्कोअर १८ ते २० च्या पुढे गेल्यावर नाशिक येथील अनेक खाजगी हॉस्पीटल अशा रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत होते. अशा अनेक रूग्णांना बेड मिळवुन देत यामध्येही त्यांचे उत्तरदायित्व थांबले नसुन मागेपुढे न पाहता मदत करतांना दिसत आहे. मोठा महामारीचा काळ सुरु असतांना काही खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांचे बिल अव्वाच्या सव्वा आकारत असल्याचे समजताच श्री. चौधरी स्वत: धाव घेऊन रूग्णांचे बिल कसे कमी करता येईल यासाठी धावपळ करतात. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात कोराना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सीजन बेड मिळणे जिकिरीचे आहे. वाढत्या रुग्णसंख्या पाहता कोरपगाव कोविड सेंटरला ऑक्सीजन बेडला मान्यता मिळाली आहे. यामुळे कोविड रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा कोविडचे लक्षणे असलेल्या रुग्णांचा विलगीकरणाचा प्रश्न उपस्थित झाल्याने कुलदीप चौधरी यांनी स्वत:च्या कावनई येथील कपिलधारा पॉलिटेक्निक कॉलेजची इमारत देऊ केली आहे. चौधरी यांनी इगतपुरी व कोरपगांव येथील कोविड सेंटरमध्ये सेवा करणारे डॉक्टर, नर्स यासह उपचार सुरू असलेले रूग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना रोज चहा व बिस्कीट मोफत वाटण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
कुलदीप चौधरी यांच्या मानवता जपणाऱ्या कार्यामुळे शेकडो लोकांना आपला बहुमोल जीव वाचवण्यास मोठी मदत झाली. तृप्तीचा आनंद देणारी लंगर सेवा, गरिबांचे बिल कमी करण्याचा दिलासा, कोविड सेंटरमधील अमृतपान सेवा आणि स्वतःच्या कॉलेजमधील कोविड सेंटरची इमारत यामुळे कुलदीप चौधरी यांचे महत्कार्य प्रकाशमान झाले आहे. संकटकाळात सर्वांच्या पाठीशी काळ टपून बसलेला असतांना काळाला सुद्धा मागे फिरायला लावणारे कोरोना योद्धे फक्त कुलदीप चौधरी आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Similar Posts

7 Comments

  1. avatar
    रमेश बोडके says:

    सलाम तुझ्या कार्याला कुलदीप…🙏🙏👍

  2. avatar
    अनिल रसाळ says:

    खुपच छान काम भाऊ
    👌जनसेवा हीच ईश्वरसेवा

  3. avatar
    INDERJEET SINGH says:

    Wah kyaa baat hai 👍👍very nice kuldeep singh 👌👌👌👌👌👍👍👍👍

  4. avatar
    राजेंद्र रामचंद्र ठोंबरे says:

    मानव सेवा हीच ईश्वर सेवा

Leave a Reply

error: Content is protected !!