महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा पेन्शन संवाद मेळावा नाशिकला उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेचा पेन्शन संवाद मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. राज्य सोशल मीडियाप्रमुख विनायक चोथे यांचे प्रमुख कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वैभव गगे तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे उपस्थित होते. जिल्हा समन्वयक अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्यकारिणीच्या कामाचा आढावा जिल्हाध्यक्ष वैभव गगे यांनी घेतला. सर्व तालुकाध्यक्षांच्या कामाबद्दल संघटनेकडून विशेष कौतुक करण्यात आले. संघटनेचे अंतिम ध्येय जुनी पेन्शन मिळवणे हेच आहे. परंतु सरकारने आणलेल्या पेन्शन योजनांच्या परिपूर्ण अभ्यासाने योग्य पर्याय ध्यानात येऊ शकतो. त्या अज्ञानामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून संवाद मेळाव्यात राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चोथे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांचे शंका समाधान करण्यात आले. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पृथ्वी राठोड यांनी संवाद मेळाव्याचे थेट युट्युब लाईव्ह केले. त्यामुळे अनेकांनी घरबसल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. नांदगाव तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय कामकाज असूनही जिल्हाभरातील शिक्षक बंधू भगिनी रणरणत्या उन्हात प्रवास करून मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पदाधिकारी बंटी भोये, दिनेश महाले, अमोल गजबार, शंकर सांगळे, विजय बडे, तालुकाध्यक्ष रवी सातव, दिलीप बेंडकोळी, मिलिंद खाडे, पंकज सोनवणे, अनिल सांगळे, हनुमंत काळे, मधुकर दोबाडे, रामदास चोभे, तालुका सरचिटणीस, तालुका पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अवधूत खाडगीर यांनी तर आभार जिल्हा सरचिटणीस प्रमोद क्षीरसागर यांनी मानले.

error: Content is protected !!