
कॉम्रेड उदाराम तुळशिराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड येथे जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. एच. डी. गांगुर्डे होते. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. सचिन अहिरे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने चिमणी दिवस विद्यालयात साजरा करण्यात आला. श्री. सचिन अहिरे यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशु-पक्षी आणि प्राणी यांचे मोठे योगदान लाभते म्हणून त्यांचे रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर जगभरात चिमण्यांच्या एकूण २६ प्रजाती असून त्यातील पाच प्रजाती आपल्या भारतात आढळतात त्यापैकी एक प्रजाती महाराष्ट्रात आढळते. असे सांगून ५० देशांमध्ये हा चिमणी दिवस साजरा केला जात असल्याचे सांगून चिमणीशी आमचे नाते बालपणापासूनच असल्याचे त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे. गोष्टींमध्ये आपल्या बाळाला *एक घास चिऊचा एक घास काऊचा* असं म्हणून घास भरवणारी आई पुढील काळात चिमणी कशी दिसत होती हे दाखवू शकेल का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण सर्रासपणे होणारी वृक्षतोड, वाढते शहरीकरण वाढते प्रदूषण या सगळ्या गोष्टींमुळे पशुपक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पशु-पक्ष्यांना अन्नपाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे आणि म्हणून श्री. सचिन अहिरे सर व श्री. गवळी सर यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवाहन करून पक्ष्यांसाठी टाकाऊ वस्तुंपासून सुंदर घरटे तयार करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली. विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्षी प्राणी यांच्या बद्दल भूतदया निर्माण होणे आवश्यक आहे म्हणून असे उपक्रम घेणे आवश्यक आहेत असे आवाहन विद्यालयातील उपशिक्षक श्री. दिपक खैरनार सर यांनी केले. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. एच. डी. गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे कारण पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. घरटे बनवण्यासाठी श्री.गवळी सरांनी भरपूर प्रकारचे साहित्य स्वतः आणले तसेच सर्वच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सुंदर घरटी बनवली तसेच पक्षांना दाना पाण्याची सोय केली. विद्यार्थ्यांसमवेत सन्माननीय मुख्याध्यापक तसेच विद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते ती घरटी झाडांवर लावण्यात आली. यावेळी घरटी बनवण्यामध्ये विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. गवळी सर, श्री. बोरसे सर, जगताप एस.आर, जगताप बी. एन. सरोदे सर, सोनवणे सर, गांगुर्डे सर, श्री. खैरनार सर, श्री. भरसट सर, गावित सर, भामरे सर, देवरे सर, बिरारी सर, श्रीमती वाघ मॅडम, गोसावी मॅडम, सोनवणे मॅडम, पाळेकर मॅडम, कोर मॅडम,जगताप मॅडम, मोरे मॅडम, गायकवाड भाऊसाहेब, चिंचोले भाऊसाहेब, संदीप देवरे, अभिजीत कोर, माळी मामा ह्या सर्वांनी विशेष सहकार्य केले. विद्यालयात हा उपक्रम विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने साजरा केला आणि ह्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. असा हा सुंदर उपक्रम विद्यालयात राबविण्यासाठी सन्माननीय मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे सरांनी सर्वांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले.